गणरायाच्या मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी विद्युत वितरण कंपनी ने हाती घेतली मोहीम


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


गणपती बाप्पाची मिरवणूक काही दिवसावर येऊन ठेवली असताना त्यात कोणत्याही प्रकारचा विद्युत वितरण कंपनीचा अडथळा येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात विद्युत वितरण कंपनी व त्यांचे कर्मचारी प्रयत्न करत असताना दिसत आहेत. म्हणून वारंवार दिवसा विद्युत प्रवाह खंडित होतो. विविध चौकातून गणपती बाप्पाची मिरवणूक जाते. त्या ठिकाणी वाहनाला अडथळा येऊन त्यामध्ये विद्युत प्रवाहित होऊ शकतो व अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी खबरदारी म्हणून कंपनी झोल असणारी सर्विस वायर, एलटी लाईन, अशा पद्धतीची दुरुस्ती मोहीम मागील दोन ते तीन दिवसांपासून राबवत आहे. गणरायाच्या उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम हाती घेतल्याचं आर. एल.शेख वरिष्ठ तंत्रज्ञ विद्युत वितरण कंपनी यांनी सांगितले तर यावेळी रवींद्र नंदनवार, सुधाकर कदम, ओंकार उपेवाड, अविनाश बाभुळकर, दीपक इंगोले, सुनील मुरमुरे, प्रवीण कांबळे, कुंडलिक शेंबडे. मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहेत.त्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यास नागरिकांनी सहकार्य करण्याच आवाहनही यावेळी करण्यात आले.