
तिरोड़ा – स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा येथील ऑटोमोबाइल शाखेच्या विद्यार्थ्यांची शिक्षक उमेंद्र रहांगडाले यांच्या प्रयत्नाने एसटी आगार वर्कशॉप तिरोड़ा येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान आगारातील वर्कशॉप मधील विविध माहिती जाणून घेतली.
राज्यातील शासकीय माध्यमिक शाळांमधील अतिदुर्बल, आदिवासी व गरीब मुलांना व्यवसायाभिमुख बनवून आत्मनिर्भर बनवण्यासाठी सन २०१५-१६ पासून राज्यातील ६४६ पेक्षा जास्त माध्यमिक शाळांमध्ये ९ वी ते १२ वी वर्गासाठी समग्र शिक्षा मुंबई व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवले जाते, या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यायोग्य प्रशिक्षण दिले जाते. व याची पुर्वतयारी म्हणून 11 वी आणि 12 वी ऑटोमोबाइल शाखेच्या विद्यार्थ्यांनी एसटी आगार वर्कशॉप तिरोड़ा येथे क्षेत्रभेट पूर्ण केली.

शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. जी. एच. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात एसटी आगार वर्कशॉप तिरोड़ा येथे क्षेत्र भेटीचे नियोजन करण्यात आले होते. या क्षेत्रभेटी अंतर्गत विद्यार्थ्यानी ऑटोमोबाइल चे प्रत्यक्षात प्रात्यक्षिके पाहिली व माहिती जाणून घेतली. यात वाहनाची सर्विसिंग, बस चे मेंटेनंन्स, बस मध्ये bs 4 व bs 6 मधील फरक, भविष्यातील इलेक्ट्रॉनिक बस ची नवीन तकनीक, वाहनाची सेफ्टी, या बद्दल कनोजे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
भेटी दरम्यान आगारातील डेपो मॅनेजर पंकज दांडगे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी घडला तर समाज घडतो पर्यायाने राष्ट्र सुद्धा घडतो जर 21 शतकातील सशक्त भारत घडवायचा असेल तर व्यवसाय शिक्षण पारंपरिक शिक्षणासी जोडून असणे आवश्यक आहे. व्यवसाय शिक्षण ऑटोमोबाइल विषय महत्वपूर्ण आहे व विद्यार्थ्यानी कौशल्यभीमूख शिक्षण घेतले पाहिजे या बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या क्षेत्रभेटीचे आयोजन उमेंद्र रहांगडाले ऑटोमोबाइल शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरोड़ा यांनी केले.
