
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हात काँग्रेस पक्षसंघटनेची बांधणी केली जात आहे. त्यादृष्टीने कार्यकारणी सर्वांना स्थान देण्यात आले आहे. कार्यकारणीत २६ उपाध्यक्ष, ४३ सरचिटणीस, ५९ चिटणीस यांचेसह कोषाध्यक्ष, प्रवक्ता आदींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर यांनी दिली. ते सोमवारी (ता.१७) जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी अशोक बोबडे, बाळासाहेब मांगूळकर, अरुण राऊत, अरविंद वाढोणकर, अनिल गायकडवाड उपस्थित होते. पुढे बोलताना मानकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर तसेच हिंगोली ह्या तीनही मतदारसंघात यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहणार आहे. असे असले तरी जिल्हात पक्ष संघटन अधिक मजबूत केले जाणार आहे. यासाठी नव्याने जिल्हा कार्यकारीणी गठीत केली आहे. यावेळी २६ जणांवर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
जिल्हातील सर्वच भागात प्रतिनिधीत्व देण्यात आल्याची माहिती मानकर यांनी दिली. उपाध्यक्षपदी मनीष पाटील, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, स्वाती येंडे, प्रकाश कासावार, पंढरी सिंहे, अनिल गायकवाड आदी २६ जणांचा समावेश आहे. नितीन जाधव यांच्यावर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून नंदकुमार गांधी सहकोषाध्यक्ष आहे. प्रवक्तापदी अरविंद वाढोणकर यांची निवड करण्यात आली आहे.
