
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, वर्धा
वर्धा दी.5जुन 2021
वर्धा जिल्हा आप च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला
वर्धा जिल्हा आम आदमी पार्टी वतीने जागतिक पर्यावरण दिन, वृक्षलागवड करून साजरा करण्यात आला .
या दिनाचे औचित्य साधून गजानन नगरी वर्धा येथे उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी वर्धा युवा आघाडीचे पदाधिकारी संदीप डंभारे यांचा वाढदिवस देखील साजरा करून त्यांना वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या संदीप डंभारे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला
कोरोना काळ बघता, आज आपल्याला खरोखर ऑक्सिजनचे महत्त्व कळले आहे,त्यासाठी आपण जिथे राहतो तिथे कमीत कमी एक तरी वृक्ष लावला पाहिजे असा संदेश या प्रसंगी जिल्हाप्रमुख प्रमोद भोमले यांनी दिला, त्या वेळी नीतीन झाडे, ममता कपूर,संदीप डंभारे ,मयूर राऊत आदी उपस्थित होते
