
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण :राळेगाव तालुक्यातील वडकी येथील इंगोले सभागृहात किसान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित सर्व धर्मीय भव्य सामूहिक विवाह मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात एकूण १४ जोडप्यांचे विवाह सामाजिक एकात्मतेचा संदेश देत विधीपूर्वक संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे संचालन मनोज क्षीरसागर यांनी केले. विवाह सोहळ्याचे उद्घाटन अपडेट इंडिया न्यूज चॅनलचे उपसंपादक रवींद्र राऊत यांच्या हस्ते पार पडले, तर अध्यक्षस्थानी सचिन किनाके (प्रतिनिधी, अपडेट इंडिया न्यूज चॅनल) उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ. कलावती कोरडे, उपसरपंच शैलेश बेलेकर, तालुका शिवसेनाप्रमुख मनोज भोयर, अरुण भाऊ फुटाणे तसेच संजय कोरडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान वडकी ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने सर्व मान्यवर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विविध धर्म आणि समाजातील कुटुंबे एकत्र येऊन सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि साधेपणाचा संदेश देण्यात आला. नवदांपत्यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना केल्या.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून नवदांपत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि एकतेच्या भावनेने भारावून गेला होता.
सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळावा हा समाजातील एकोपा वाढवणारा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आधार ठरणारा उपक्रम ठरला.
