सौ. सपनाताई तातेड यांचे ९ उपवास


प्रतिनिधी/प्रवीण जोशी
यवतमाळ


वर्धमान जैन धर्म स्थानक मध्ये चातुर्मास मोठ्या उत्साहात सुरू आहे यावर्षी अधीकमास असल्यामुळे पाच महिने संत सानिध्याचा लाभ मिळणार आहे. जैन धर्म स्थानक मध्ये आचार्य भगवान १००८ श्री रामलालजी म. सा. यांच्या आज्ञानुवर्तिनी शासन दीपिका महासती सुभक्ती श्री जी म. सा.,साध्वी सुरूचा श्रीजी म. सा. , साध्वी दीपिका श्रीजी म. सा. साध्वी निर्वेद श्रीजी म. सा. ठाणा ४ हे विराजमान आहेत.
जैन स्थानक बाभुळगाव येथे संत सानिध्यात दररोज सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत प्रवचन होत आहे. या ठीकाणी भारतातील विविध भागातून श्रावक वर्ग संत दर्शन, वंदन करण्याकरिता व धर्म लाभ घेण्यासाठी येत आहे.
दरम्यान या ठीकाणी तप आराधना मोठ्या उत्साहात सुरू आहे जैन धर्मीय बांधवांसोबत इतर धर्मीय बांधव सुद्धा तप करीत आहे . अशातच बाभुळगाव येथील प्रसिद्ध व्यवसायिक नितीन तातेड यांच्या धर्मपत्नी सौ. सपनाताई तातेड यांनी सुद्धा ९ दिवसीय उपवास तप आराधना केली. या उपवासात अन्न त्याग करून सकाळी ९ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत गरम पाणी प्राशन केल्या जाते तर कोणी निर्जल उपवास करतात.