
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे दि 22 जुलै रोज सोमवारला शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील महिला नागरिकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला शहरातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.अशातच पिंपळापूर गावचे सरपंच रवी चौधरी,सचिन डोरलीकर,निखिल शेळके,महेश आवारी,अनिल नंदुरकर यांनी पाणी पुरवठा अधिकारी गेडाम यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.गावोगावी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या बोगस कामाची कथा त्यांच्यापुढे वाचली. मात्र इंजिनियर गेडाम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यावेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्याने तिथून पळ काढला. तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या बोगस कामामुळे नागरिक वैतागले आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी पक्के रस्ते फोडण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
