
सहसंपादक : रामभाऊ भोयर
चार चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि ११ डिसेंबर रोजी नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील वडकी ते बोरी गावाजवळ घडली.
विकास रामलाल येलके वय 28 वर्षे रा, बोरी इचोड असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
दुपारच्या सुमारास तो मोटारसायकल क्र एम एच 32 ई 3783 ने वडकी वरून बोरी इचोड आपल्या गावी जायला निघाला असता नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील वडकी ते बोरी गावाचे दरम्यान समोरून येणाऱ्या के ए 35 पी 3236 या चारचाकी वाहनाने मोटारसायकलला जबर धडक दिली.या अपघातात विकास येलके याला डोक्याला व हाता पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागला असून त्याला पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे
