
सहसंपादक -रामभाऊ भोयर
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंच च्या तिसऱ्या सभेचे आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे स्मृती दिनानिमित्त दिनांक १० एप्रिल रोजी रिधोरा येथील प्रगतीशील शेतकरी हरिश काळे यांच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाला . याप्रसंगी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त जगदीश चव्हाण गाझीपुर ( उपाध्यक्ष) शेतकरी शास्त्रज्ञ मंच, डॉक्टर सुरेश नेमाडे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्रप्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, अमोल जोशी उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ, सरपंच उमेश गौऊळकार रिधोरा, नरेंद्र केवटे झाडगाव, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे राहुल चव्हाण शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी डॉक्टर प्रमोद मगर, शास्त्रज्ञ कीटकनाशक गणेश काळुसे, शास्त्रज्ञ पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर जगदीश चव्हाण गाझीपुर शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपाध्यक्ष यांनी विद्यापीठाचे विकसित व कमी खर्चिक तंत्रज्ञान आपल्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून राबवावे. असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाच्या प्रस्ताविक पर मयूर लोंढे शास्त्रज्ञ विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विशद केले तर कार्यक्रमाचे आयोजक रिधोरा येथील प्रगतिशील शेतकरी हरीश काळे यांनी सर्व उपस्थित शेतकरी बांधवाचे स्वागत करून शेतीमध्ये करीत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल तसेच घेत असलेले उत्पादन व उत्पादनाबाबत मनोगत व्यक्त केले .तर याप्रसंगी राळेगाव तालुक्यातील प्रगतीशील व नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतावर राबवित असलेल्या उपक्रमाविषयी या परिसरातील शेतकरी संदीप हांडे सफरचंद लागवड करते, सतीश जाधव मिरची लागवड करते, रुपेश कांडूरवार सिताफळ लागवड करते, सुमित राऊत कोरफड लागवड करते, सदानंद ठमके टरबूज, खरबूज, संत्रा, लागवड करते यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना सखोल माहिती दिली तसेच शेतकरी शास्त्रज्ञ मन च्या उपस्थित सदस्यांनी आपल्या कार्याविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना परिचय दिला तसेच तांत्रिक सतरा मध्ये डॉक्टर सुरेश नेमाडे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्रप्रमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, यांनी पारंपारिक पीक पद्धतीमध्ये पिकाची फेरपालटीचे महत्व तसेच फळबाग व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर डॉक्टर प्रमोद मगर शास्त्रज्ञ कीटकनाशक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी फळबागेतील कीड व रोग या व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर राहुल चव्हाण शास्त्रज्ञ कृषी अभियांत्रिक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी आधुनिक कृषी अवजारे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर गणेश काळुसे शास्त्रज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी शेळीपालन व कुक्कुटपालन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रक्षेत्र भेटीमध्ये हरीश काळे यांनी आपल्या शेतीमध्ये राबवित असलेल्या शेळीपालन कुक्कुटपालन मधुमक्षिका पालन व लागवड केलेल्या केळी, ऊस प्रक्षेत्रास भेटी दिल्या सदर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक शेतकरी गजानन आत्राम एक लारा, यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरीश काळे यांनी केले, हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रिधोरा गावातील शेतकरी बांधव व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सर्व सदस्य व भरत सिंग सुलाने सहाय्य, अमोल कडू यांनी सहकार्य केले
