राळेगाव तालुका काँग्रेस वकील सेलेच्या तालुकाध्यक्षपदी अँड किशोर मांडवकर यांची निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी कुटुंबातील सध्याला राळेगाव वास्तव्याला असलेले राजकारणाची आवड व सामाजिक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे तर त्यांच्या कार्याची दखल घेऊन अँड किशोर पांडुरंगराव मांडवकर यांची राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी वकील सेलच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे हि निवड अँड प्रफुल्ल मानकर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ यांनी केली त्यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते माजी शिक्षणमंत्री प्रा वसंत पुरके व जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ अँड प्रफुल्ल मानकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याचवेळी, रविंद्र शेराम नगराध्यक्ष राळेगाव, उपाध्यक्ष जानराव गिरी, शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे उपस्थित होते


तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहु कायदेशीर अडचणी सोडवण्यास कटीबद्ध राहुन काँग्रेसची विचारधारा पुढे नेण्यासाठी काम करु


अँड किशोर मांडवकर तालुकाध्यक्ष वकील सेल काँग्रेस कमिटी राळेगाव