गोदावरी फाउंडेशन ढाणकी व गोदावरी अर्बन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी अनेक नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन महिलांना मिळाला मंच


प्रतिनिधी :प्रवीण जोशी,यवतमाळ


गोदावरी अर्बन शाखा ही स्थापन होऊन ढाणकी शहरात काही दिवस झाले असून अनेक सामाजिक व विविध महिलांच्या कला कौशल्याला वाव मिळेल असे कार्यक्रम आयोजित करीत आहेत तसाच कार्यक्रम यावेळी सुद्धा आयोजित करण्यात आला आहे कोरोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना व गरजवंतांना फळ आणि अन्नाची व जी वस्तू लागेल ती देऊन मदत करण्याचा प्रयत्न नेहमीच गोदावरी अर्बन ने केलेला आहे विशेष एवढ्या मोठ्या गोदावरी अर्बन फाउंडेशनचे साम्राज्य सांभाळणारी कर्तबगार सौ राजश्रीताई पाटीलच आहेत हे प्रामुख्याने येथे सांगावेसे वाटते.

महिला मंडळांचा आवडता आणि जिज्ञासू विषय म्हणजे रांगोळी स्पर्धा ही नेहमीच महिलांना हवीहवीशी वाटते तशीच रांगोळी स्पर्धा दि १५/३/२०२३ रोजी आर्य वैश्य मंगल कार्यालय गांजेगाव रोड ढाणकी येथे आयोजित करण्यात आलेला आहे रांगोळी स्पर्धा प्रामुख्याने आयोजित केली असताना स्त्रीभ्रूण हत्या हा ज्वलंत प्रश्न समाजापुढे असताना हा प्रश्न रांगोळी स्पर्धेतून मांडणे म्हणजे खरोखरच वाखण्या जोगेच काम आहे रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास आरती विभुते(७३८५०९८६८०), अनुराधा योगेवार( ८६००९६१९६५) वैशाली येरावार( ९४२३३१३६९७)यांच्या कडे नोंद करावी तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे सुद्धा आयोजन या ठिकाणी यावेळी करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये थोर समाजाला दिशा देणाऱ्या महिलांचा समावेश केलेला आहे त्या मधे माता रमाई, जिजाऊसाहेब, अहिल्यादेवी, निराधारांची माय म्हणून ओळख असणारे सिंधुताई सपकाळ, आकाशामध्ये भरारी घेऊन महिला सुद्धा प्रत्येक बाबींमध्ये सक्षम आहे हे दाखवणारी कल्पना चावला, किरण बेदी, लता मंगेशकर, मदर तेरेसा, राणी लक्ष्मीबाई अशा समाजाला दिशा देणाऱ्या कर्तबगार महिलांचा फॅशन ड्रेसच्या रूपाने कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास सुप्रिया चींन्नावार( ८८५७९९४०९०),सरस्वती चिन्नावार, (८१७७९५०७२१) शितलसोनी( ९५५२६३८०४५)यांच्याकडे नोंद करावयाची आहे तसेच आपले विचार वक्तृत्व स्पर्धेत तून मांडण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेली आहे यास अनुसरून विषय पुढील प्रमाणे आयोजले आहे. कुटुंब संसार करिअर यांचा ताळमेळ साधणारी अष्टभुजा, स्त्री सन्मान आणि तिच्या आरोग्य, आजची सशक्त स्त्री, उद्योगात महिलांचा सक्रिय सहभाग असे ज्वलंत आणि महत्त्वाचे प्रश्न पटलावर ठेवून गोदावरी अर्बन शाखा ढाणकी यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच वरील कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास आशा कलाने (समन्वयिका गोदावरी फाउंडेशन)९६०४७९९४५१. यांच्याशी सुद्धा संपर्क करता येईल.