
मौजे सारखणी येथील ग्राम सेवक वाडेकर यांच्या बदली संदर्भात निवेदन अणि तक्रारी अर्ज वरिष्ठ अधिकारी व लोक प्रतिनिधी यांना देण्यात आले होते
सद्रिल ग्राम सेवक वाडेकर यांच्या बदली चा विषय मौजे सारखणी येथील नागरिकांच्या लक्ष वेधीचा ठरला होता
पण अध्याप बदली संदर्भात कोणत्याही प्रकारची कर्यवाही मौजे सारखणी येथील नागरिकांना पहावयास मिळाला नसल्याने
बदली का झाली नाही या विषयास अनुसरून नागरिकांन कडून अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकावयास मिळत आहेत.
मौजे सारखणी येथील ग्राम पंचायत निवडणुक येत्या काही महिन्यावर येवून ठेपली असल्याने ग्राम सेवक वाडेकर यांची बदली झाली नसल्याने येणाऱ्या निवडणूकीवर सदरील विषयाचा गांभीर्य पूर्वक परिणाम होवू शकतो अशी शक्यता नागरिक दर्शवत असताना दिसून येत आहे.
ग्राम सेवक वाडेकर हे ग्राम पंचायत कार्यालय सारखणी येथे नागरिकांच्या कामांना वेळ देत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली जात असे
ग्राम सेवक वाडेकर यांच्या कडून ग्राम पंचायत कार्यालय ची कामे नांदेड अणि किंनवट येथून होत असल्याचे आरोप देखील त्यांच्या वरती नागरिकांन कडून होत होते सद्रील विषयास अनुसरून गावातून अनेकानी त्यांच्या बदलीच्या तक्रारी वरिष्ठांना दिल्या पण अद्याप त्यांची बदली संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
वरीष्ठ अधिकारी ग्राम सेवक यांची पाठ राखण करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली असुन येणाऱ्या निवडणुकीत सरपंच अणि सदस्य पदा साठी नागरीक वर्गणी च्या माध्यमातून सर्व अनुमते पॅनल उभे करून निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रीया ऐकावयास मिळत आहे
