
लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप जाधव
उमरखेड मधील ढाणकी शहरामध्ये एक महिन्यापूर्वीची घटना सौ.ताराबाई साहेबराव मिटकरे वय:४५ ही गॅस वर स्वयंपाक करताना तिची साडी अचानकच आगीच्या झपटेमध्ये ऐवून तिचा पाय तळ पायापासून ते कमरे पर्यंत पूर्णतः जाळून काळभोर पडून गेला. तेव्हा ढाणकी येथे प्रथमउपचार केंद्रात पूर्णतः उपचार झाले नाही.जवळ पास एक महिना इकडे-तिकडे जाए करत पाय कुजून खराब होण्याची स्थिती बनली होती,तेव्हा श्री.रमण पाटील व
श्री. नामदेव गोपवाड सर यांनी सकाळी यवतमाळ येथे पाठवले असता हेल्प फाउंडेशन यवतमाळ जिल्हा संचालक श्री.भाविक भगत यांनी १००% त्या पेशंटला वेळ देवून त्यावर डॉक्टराना उपचार करण्यास भाग पडलं व एका महिलेचा पायावर व्यवस्थित रित्या उपचार सुरू आहे.
