कारंजा येथे संताजी जयंती उद्या,संताजी युवक मंडळाचे आयोजन

कारंजा (घा):-येथे संतश्रेष्ठ श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची दिनांक ८ डिसेंबरला जयंती संपूर्ण भारतभर तेली समाज बांधवांकडून साजरी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर कारंजा(घा) येथे सुद्धा श्रेष्ठ श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचे आयोजित केलेले आहे. याप्रसंगी सर्व तेली समाज बांधव व समस्त गावकरी यांना आवाहन करण्यात आले व या जयंती उत्सवात सहभाग नोंदवावा, असे आव्हान महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, संताजी क्रेडिट को- आपरेटिव्ह सोसायटी, संताजी नवयुवक मंडळ, व संताजी उत्सव समिती यांच्याद्वारे करण्यात आलेले आहे. यानिमित्त संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन,पालखी मिरवणूक, व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी याचा समस्त गावकरी तसेच परगावकरी समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.