वादळी पावसाने केळी पिकाचे प्रचंड नुकसान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी

▪️
फुलसावंगी प्रतिनिधी /संजय जाधव


शेतकरी शे.मुस्ताक शे.छोटू यांनी सहा एक्कर मध्ये त्यांनी ७ हजार केळींची रोपांची लावगड केली होती.मोठ्या मेहनतीने केळी लहानाची मोठी केली.परंतु दि.२२ मे रोजी झालेल्या चक्रिवादळाने त्यांच्या शेतातील जवळपास १५०० केळी ची झाडे भुईसपाट झाली आहेत.२२ मे रोजी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि यामध्ये केळी या पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यासमोर या नैसर्गिक आपत्तीमुळे संकट निर्माण झाले आहे. केळीसारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करून तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली हे पीक क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर नष्ट होताना त्या शेतकऱ्यालचे काय हाल होत असतील ते त्या शेतकऱ्यालाच माहित तरी महसुल विभागाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांने शासन दरबारी केली आहे‌.
_———–


नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाने दि २३ ला स्थानिक तलाठी यांना केळी पिकाच्या नुकसानीची माहिती दिली तर गुरुवारी सुट्टी आहे मी उद्या येतो असे सुनावले आज शुक्रवारी सतत फोन केला तर फोन उचलला नाही.