
जिल्हा प्रतिनिधी :प्रवीण जोशी ,यवतमाळ
इंग्रजी शाळेतील निकाल लागला भरपूर मोठ्या प्रमाणात गुणांचा महाप्रसाद वाटला व आपली पटसंख्या कायम ठेवून लुटीचे राजकारण येणाऱ्या काळात सुद्धा कायम राहील हे धोरण अवलंबताना इंग्रजी शाळा दिसत आहेत.
नुकताच सीबीएससी बोर्डाचा निकाल लागला असून अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात गुण मिळाले अक्षरशः पैकीच्या पैकी पण त्या मिळालेल्या गुणांना अवसान आहे का हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आपली शिक्षण पद्धती ज्ञान केंद्रित नसून परीक्षा केंद्रित आहे त्यामुळे विद्यार्थी गुणवान होण्याऐवजी मार्क्सवादी होत आहे आज देशाला मार्क्सवादी विद्यार्थी नको तर गुणवान विद्यार्थी हवे कारण संख्यात्मक निकाल हा उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठीच असतो गुणात्मक विकासा माणूस घडवण्यासाठी असतो. तसेच जीवनाची जडणघडण ही मातृभाषेत व्हावी असे शिक्षण तज्ञ सांगत असतात पण सध्या पालकाकडून इंग्रजी व सीबीएससी शाळेला पसंती देण्यात येत असल्यामुळे अर्थातच पालकाकडून इंग्रजीची मागणी व प्रवेशासाठी पालकच आग्रह धरत असल्यामुळे शाळा सुद्धा फी वाढून आपला वरवंटा सर्वसामा न्यावर फिरवत असून त्याला पालक जबाबदार आहे. म्हणूनच इंग्रजी व सीबीएससी शाळेचे प्रशासन नाठाळ व मुजोर बनत आहे. अशा शाळा प्रशासनाला जर आवर घालावयाचे असल्यास पालकांनी “फी” रुपी न का सु र आळवून प्रवेश घेऊन अधिक बळकटी देऊ नये प्रवेश घेणे कमी केले म्हणजे नक्कीच येणाऱ्या काळात फी आपोआपच स्थिर राहील किंवा वाढ होणार नाही अन्यथा पालकांसमोर फी चे खूप मोठे आव्हान उभे ठाकेल.
