खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी व अधिकारी तीन दिवसीय संप,तोडगा न निघाल्यास बेमुदत संपावर जाऊ*

राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शेतकरी व सामन्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणने संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. ४,५ व ६ जानेवारी २०२३ असा तीन दिवस हा संप पुकारला आहे.
गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज पासून संपावर गेले आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे.

वीज कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत.4 जानेवारी पासून ७२तासांचा हा संप असून यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी आहे.कंत्राटी,आऊट सोर्सिग व सुरक्षारक्षक यांना नोकरीत कायम करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरा,महावितरण मधील उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवा अश्या मागण्यांना घेत संप सुरू झाला आहे. दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताआहे.

महावितरणच्या खासगीकरण विरोधात महाजेनको व वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाअसून केंद्र व राज्य सरकारचा खासगीकरणाचा डाव यशस्वी होऊ न देण्याचा निर्धार यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आज सकाळी वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. आज सकाळपासून तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत असून काही ठिकाणी मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील 72 तासात वीज पुरवठा सुरळीत राहील की नाही याची मात्र कोणीच शाश्वती देत नाहीय.
खाजगीकरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी व अधिकारी तीन दिवसीय संप

राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे शेतकरी व सामन्य ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरणने संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. ४,५ व ६ जानेवारी २०२३ असा तीन दिवस हा संप पुकारला आहे.
गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊन अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज पासून संपावर गेले आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे.

वीज कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत.4 जानेवारी पासून ७२तासांचा हा संप असून यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी आहे.कंत्राटी,आऊट सोर्सिग व सुरक्षारक्षक यांना नोकरीत कायम करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरा,महावितरण मधील उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवा अश्या मागण्यांना घेत संप सुरू झाला आहे. दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताआहे.

महावितरणच्या खासगीकरण विरोधात महाजेनको व वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाअसून केंद्र व राज्य सरकारचा खासगीकरणाचा डाव यशस्वी होऊ न देण्याचा निर्धार यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. आज सकाळी वरोरा येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला. आज सकाळपासून तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत असून काही ठिकाणी मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. वरोरा विभागातील वीज
कर्मचाऱ्यांचे संपाचे नेतृत्व विनोद कुमार भोयर, प्रफुल
लालसरे, संतोष लोहे, अरुण गायकवाड, सचिन डुमरे,
अविनाश देवतळे, प्रवीण मल्लेवार, प्रवीण धानोडे,
चंद्रकांत नागरकर, जयप्रकाश लोणगाडगे, सुमित पेटकर,
देवानंद गायकवाड योगेंद्र मडावी, मोहन शेंडे, रामकृष्ण
राजुरकर, नरेंद्र वंजारी, मुरलीधर गायकवाड, सतीश एकरे,
आनंदराव टापरे, शुभम लड्डा आदी करीत आहेत.