
सहसंपादक:- रामभाऊ भोयर
वडकी: मारेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील सुभाष पचारे व मोहन पचारे यांची मद्य धुंद अवस्थेत दोघांत शाब्दिक खडाजंगी झाली त्यात मोहन पचारे या युवकाने थेट खलबत्त्याने ठेचून कोयत्याने वार केले.यात 50 वर्षीय सुभाष संभाजी पचारे या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी कोसारा येथे सकाळी 9.30 वाजताचे दरम्यान घडल्याने कोसारा व परिसरात खळबळ उडाली आहे.
सुभाष संभाजी पचारे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून सुभाष व मोहन देविदास पचारे(29) दोघेही रा.कोसारा हे आज सकाळ पासूनच तळीरामाच्या भूमिकेत होते. दोघेही दूरवरचे गणगोत असतांना दारूच्या नशेत झिंगुण दारूसाठीच त्यांचा शाब्दिक वाद विकोपाला गेला.अशातच वादाचे भयाण रूपांतर होत मोहन पचारे याने दगडी बत्ता घेत सुभाष पचारेच्या डोक्यावर मारला.रक्तबंबाळ व निपचित पडलेल्या सुभाष पचारे याच्या शरीरावर मोहन पचारे याने पुन्हा कोयत्याने वार केले.या घटनेत सुभाषचा जागीच मृत्यू झाला.सुभाष पचारे हे मागील वीस वर्षांपासून रोजमजुरी करीत एकटेच जीवन जगत होते.चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे त्यांची पत्नी , एक मुलगा, एक मुलगी मागील वीस वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याची माहिती आहे. हत्येची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश कींन्द्रे , मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी मोहन यास ताब्यात घेतले आहे.