राळेगाव वडकी रोडवर भीषण अपघात


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव वडकी रोडवर सावंगी पेरका या गावाजवळील टर्निंग वर रात्री अंदाजे बारा वाजता स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच 35 पी 1215 ही गाडी सात फुट खोल खड्ड्यात पडली अशी उपस्थित नागरिकांकडून माहिती प्राप्त झाली आहे. सावंगी या गावाजवळील वळण मार्ग अतिशय धोकादायक आहे समोरील येणारे वाहन दिसत नाही तसेच या वळण मार्गावर कोणतेही दिशा दर्शक फलक लावण्यात आले नाही आहे .त्यामुळे हा अपघात झाल्याचे कळले अपघात ग्रस्त वाहनांमध्ये एकूण तीन प्रवासी प्रवास करीत होते अशी माहिती राळेगाव पोलीसांकडून प्राप्त झाली जखमीची ओळख पटली नाही. जखमींना ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे उपचार घेण्यासाठी पाठवले आहे .