लोकहित महाराष्ट्र उमरखेड तालुका प्रतिनिधी: संदीप बी जाधव
साधारणता टमाटर ला आज 150 ते 180 रुपये प्रति किलो भाव आहे. बाजार मंडीमध्ये मात्र शेतकऱ्याना 40ते 50 रुपये प्रति किलो दर दिले जाते. यामध्ये व्यापारी वर्ग व दलाल यांचे कमिशन जास्त असते. त्यामुळे साधारणता मार्केटमधून आणून जे गाड्यावर विकतात ते देखील शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसे कमावतात. शेतकरी राबराब राबवून पीक घेतात पण त्यांच्या पिकांना योग्य तो भाव मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांना हमीभाव द्या असे रवी भाऊ जमदाडे ढाणकी येथील शेतकऱ्यानी सांगितले.
सरकारच्या हलगर्जीपणामुळे आमच्या पिकांना योग्य भाव नाही .बियाणे लावून त्याची रोपटे बनवणे व त्याला पाणी टाकून मोठे बनवणे एवढे सोपे नसते, जमिनीची मशागत, निंदन, वखरण ,लागवड कोळपी, रासायनिक खत, शेणखत, फवारणी एवढा खर्च लावून दिल्लीला शेतकऱ्यांना कधी निसर्गाच्या अवकृपेला सामोरे जावे लागते. पीक घरी आणून बाजारपेठेमध्ये पुरेसा भाव मिळत नसल्या अभावी घेतलेलं कर्ज याची परतफेड पण होत नाही.धान्य साठवणूक न करता शेतकरी वेळीच व्यापाऱ्यांना विकतो व ते व्यापारी गोडाऊन मध्ये ठेवून जेव्हा भाव वाढेल तेव्हा मार्केटमध्ये विकतात यामध्ये शेतकरी वर्गाच्या हातामध्ये मुद्दल पण पैसा वसूल होत नसून व्यापाराच्या तिजोरीमध्ये पैसा जमा होते. जर सरकारने हमीभाव दिला तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेल असे ढाणकी येथील शेतकरी अशीष मिटकरे यांनी सांगितले.
