
यवतमाळ जिल्ह्यातील सोळा जिल्हा परिषद सदस्य,एकूण तीस पंचायत समिती सदस्य,तसेच एकूण चौसष्ठ नगर परिषद सदस्यांनी व विविध तालुक्यात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ‘बाळासाहेबांचे शिववसेनेला’ पाठिंबा जाहीर केला.ह्या भेटीचे अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात बाळासाहेबांचे शिवसेनेच्या मागे असलेली ताकद दिसून आली .ह्या प्रसंगी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, पराग पिंगळे, हरिहर लिंगमवार, गजानन बेजकिंवार प्रामुख्याने उपस्थित होते.ह्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य व उमरखेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख चितांगराव कदम ह्यांनी पोफळी व मुळावा परिसरातील सरपंच, उपसरपंच, सहकार क्षेत्रातील अनेक समर्थकांसह ‘बाळासाहेबांची शिवसेनेला’ समर्थन दिले.तसेच महागाव नगर पंचायतीचे नगर सेवक व गटनेते रामराव नरवाडे ह्यांचे नेतृत्वात तीन नगरसेवकांनी तसेच राळेगाव नगर पंचायतीचे सभापती संतोष कोकुलवर ह्यांनी सुद्धा ‘बाळासाहेबांची शिवसेनेला’ समर्थन दिले.ह्या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे मार्गदर्शक विनोद मोहितकर यांचे नेतृत्वात किशोर नांदेकर, सुधाकर गोरे, राजू तुराणकर, बालू चेडे, मोरेश्वर सरोदे, नाना सुगंधे, विशाल किन्हेकर, विजय मेश्राम, ललित लांजेवार, मनिष सुरावर, टिकाराम खाडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री निवास वर्षा बंगल्यावर भेट. शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
