
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील एकबुर्जी येथे आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दिवांशू गजानन रोकडे (वय अंदाजे 15) यांचा भिंत कोसळून मृत्यू झाला.घटना सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली.आपल्या राहत्या घराजवळील एका जुन्या इमारतीजवळ होते, त्याच दरम्यान अचानक भिंत कोसळली आणि ती त्यांच्या अंगावर पडली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली व त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देत अधिक तपास सुरू केला आहे. जुनी व जीर्ण झालेली बांधकामं किती धोकादायक ठरू शकतात, याचे हे ताजे उदाहरण आहे.
दिवांशू रोकडे हे एक कर्तबगार बालक होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
