

हिंगणघाट:–
हिंगणघाट दि 05 सप्टेंबर 2024
नगर परिषद हिंगणघाट द्वारा संचालित जी. बी. एम. एम. हायस्कूल ज्यू कॉलेज हिंगणघाट येथे एक आगळा वेगळा कार्यक्रम करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व नवीन शिक्षकांना तसेच प्राचार्य राहलेल्या माजी प्राचार्या कडुण अनुभवी व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन मिळावे या हेतूने काही उपक्रमशील शिक्षक यांच्या विचाराला चालना देत प्राचार्य सुनील फुटाणे यांच्या सहविचाराने v मातृवृक्ष परिवार यांच्या सौजन्याने माजी प्राचार्य यांना सन्मानाने आमंत्रित करून त्यांच्या सत्काराचा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सन्मानीय माजी प्राचार्य अनवर पाशा सिद्दीकी, वासुदेव त्रिवेदी, सुरेश वाटकर, ललिता बेलेकर, विष्णू इटणकर, गंगाधर ढगे व चिंतामण धोटे उपस्थित होते. प्राचार्य फुटाणे व उपमुख्याध्यापक कुरेशी व पर्यवेक्षक तराळे, कनिष्ठ महाविद्यालययाचे ठाकडा यांनी सर्व माजी प्राचार्य यांचे शाल, रोपटे व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य सन्मान स्विकारून सर्वांनी आयोजन समिती चे आभार व्यक्त केले व अनुभवातून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन पवार सर यांनी केले. संगीत शिक्षक रामचंद्र खंदारे यांनी माणुसकी शिकविणारे गीत गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमात स्वयंशासन यामध्ये उत्कृष्ठ अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील फुटाणे होते. आभार प्रदर्शन डॉ अनिस बेग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप मुख्याध्यापक कुरेशी, पर्यवेक्षक संजय तराळे, किशोर उकेकर, डॉ अनिस बेग त्रिरत्न नागदेवे, धंनजय पवार, प्रा पुसदेकर, प्रा सोनकुसरे मॅडम, बोदेले सर, पुलगमकर सर व सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम केले.
