ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर – भूवैकुंठ समिती कडून महत्वाचे आवाहन

वणी :- ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर भूवैकुंठ समिती सांगोला रोड पंढरपूर यांचे कडून या समितीच्या सर्व सहयोगी सदस्यांना आवाहन करण्यात आले आहे. की सदर संस्थेची अशी कोणतीही अधिकृत आमसभा अडयाल टेकडी ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे ता.३ डिसेंम्बर २०२२ रोजी आयोजित केलेली नाही. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.

  

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी तालुका तिवसा रजिस्टर क्रमांक १६२ प्रणित ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर अशी बनावट , बोगस व अवैध समिती स्थापन केली असून गैरकायदेशीरपणे मौज अड्याळ टेकडी ता. ब्रम्हपुरी येथे पंढरपूर येथील भुवैकुंठ समितीच्या नावे आमसभा आयोजित केली आहे. याबाबत वॉट्सअप्प वरून एक मेसेज फिरत आहे. त्यानुसार ता.३ डिसेंम्बर २०२२ रोजी मौजे अद्याळ टेकडी तालुका ब्रम्हपुरी येथे आमसभेचे आयोजन केल्याचे कळते आहे. या आमसभेचा व भू वैकुंठ समिती पंढरपूर यांचा कोणताच व कसलाच संबंध नाही. भू वैकुंठ समिती पंढरपूर यांची आमसभा २६ मे २०२२ रोजी पंढरपूर येथे संपन्न झालेली आहे. या आमसभेत श्री राजेश वसंतराव ठाकरे यांच्या गैरवर्तनुकीमुळे त्यांची सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली तर ता. १३ जुलै २०२२ रोजीच्या मासिक सभेत माजी सचिव श्री नत्थू भुते, माजी व्यवस्थापक सुधीर ठाकरे, यांचेवर पंढरपूर येथील भु वैकुंठ समितिची संपूर्ण मिळकत अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे स्वाधीन करण्याचे कट रचल्याने यांना या पदावरून निष्कशीत करण्यात आले आहे. या तींघांनी मिळून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व प. पू. तुकारामदादा यांच्या विचारला तिलांजली देऊन संस्था हळप करण्याचा हेतू उराशी बाळगून या तीन लोकांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची बस्थान बांधून ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिराची मिळकत गिळंकृत करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे. व यांनी ही बेकायदेशीर आमसभा आयोजित केली आहे. तरी या आमसभेचा व पंढरपूर येथील भू वैकुंठ समितीचा कसलाही संबंध नाही. असे आवाहन समितीचे अध्यक्ष जनार्दन देठे गुरुजी व कार्याध्यक्ष रघुमाथ माचेवाड, सचिव दिलीप रामदासजी भोयर यांनी केले आहे.