
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात सुंदर स्वप्न पेरावी, त्यांना सुंदर स्वप्न बघण्यास प्रेरित करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पूरके यांनी केले. ते महात्मा जोतीबा फुले माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाढोणाबाजार येथे आयोजित शिक्षक दिन व शिक्षक सन्मान पुरस्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लुकमान शेख गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती राळेगाव,. देवतळे मॅडम विस्तार अधिकारी पं. स. राळेगाव, शेरअलीबापू लालानी सदस्य रासेयो समिती, माडेवार साहेब शिक्षण विभाग यवतमाळ, अरविंद वाढोनकर , एल जे पारखे , प्राचार्य जितेंद्र शेंडेकर हे उपस्थित होते. .वसंत पुरके पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना नेहमी अतृप्त रहावे व आपली तहान ज्ञानाने भागवावी. स्वतःचे परीक्षण केल्याशिवाय मोठे होता येणार नाही. मोठे स्वप्न बघा, परिश्रम करा व समाज हितासाठी नेहमी तत्पर रहा असा मोलाचा संदेश त्यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यालयाच्या वतीने वाढोणाबाजार परिसराच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आमंत्रित करून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी. एल जे पारखे, सर्वोदय विद्यालय रिधोरा, अशोक बोबडे जि. प. उच्च प्राथमिक शाळा वेडशी, जलपत शेडमाके, जि. प. माध्यमिक शाळा वाढोणाबाजार, गुणवंत इंगोले जि.प. उच्च प्राथमिक शाळा वाढोणाबाजार, . प्रदीप शेळके जि.प. उच्च प्राथमिक शाळा सावनेर, कुसुमाकर झिलपे जि. प. उच्च प्राथमिक शाळा आटमुर्डी या मुख्याध्यापकांचा व तेलंग पौर्णिमा माध्यमिक विद्यालय सावनेर या शिक्षकाचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शेख लुकमान गटशिक्षणाधिकारी पंचायत समिति राळेगाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमूर्ती मुख्याध्यापक एल जे पारखे ,गुणवंत इंगोले, अशोक बोबडे ,प्रदीप शेळके या मुख्याध्यापक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन रंदळे यांनी केले तर आभार कु. अर्चना पडोळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रा. श्यामसुंदर चलाख, राहूल निशाने मुख्याध्यापक, अतुल राऊत, कु. रूपाली वाघ हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
