इंदिरा गांधी कला महाविद्यालयात “संविधान दिवस” साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. कपिल जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रा. स्वप्नील गोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रस्ताविकेत संविधान उद्देशिका बद्दल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर संविधान उद्देशिका सामुहिक वाचन व शपथ ग्रहण करण्यात आली. प्रमुख वक्ते प्रा. कपिल जगताप यांनी संविधान म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी झाली, संविधांमुळे देश कसा सुरळीत चालतो, संविधानातील मुलभूत हक्क अशा अनेक बाबींची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली माहिती दिली. गुरुत्वाकर्षण शक्ती मुळे आपण ज्याप्रकारे जमिनीशी निगडीत आहोत तशीच शक्ती संविधानात आहे. भारत देशात अनेक जाती, धर्म, पंथांचे लोक राहातात, विविध प्रदेश, संस्कृती आणि भाषा असूनसुद्धा भारताची एकात्मता संविधानामुळेच टिकून आहेत. आपल्या भारताची अखंडता ही संविधानामुळेच टिकून आहे, असे अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. व्ही. आगरकर, यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील गोरे यांनी केले. कार्यक्रमाला रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री लोहकर , रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल लिहितकर, सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.