
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अनेक वर्षापासून राळेगाव नगर पंचायत हद्दी मध्ये असणारे दुकानदार तसेच लोकांच्या दैनदिन गरजांची पूर्तता करणारे व्यवसायिक यांच्या विरोधात नगर पंचायत कडून बेकायदेशीर रित्या नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. या नोटीस यवतमाळ – बसस्थानक रोड ला च्या बाजुला व्यवसाय करणाऱ्या एकूण ९ लोकांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. या ९ लोकांन पैकी काही लोकांनी या नोटीस विरोधात वि. दिवाणी न्यायालय (क.स्तर), राळेगाव येथे नगर पंचायत विरोधात कायमचा मनाई हुकुम मिळावा यासाठी दावा दाखल केला आहे. सुरुवातीला नगर पंचायत राळेगाव यांनी बेकायदेशीर तोंडी नोटीस दिली होती. या तोंडी नोटीस मध्ये नगर पंचायत यांनी दुकान कोणत्या कारणासाठी हटवत आहे याची कोणतीही माहिती स्थानिक दुकनदार यांना दिली नाही. तोंडी नोटीस देवून नगर पंचायत अस कोणतेही पाउल उचलणार नाही याचा विश्वास स्थानिक दुकानदार यांना होता. परंतु लगेच लेखी नोटीस दिल्याने स्थानिक दुकानदार यांना जगण्या पासून अस बेकायदेशीर रित्या वंचित केल जाईल म्हणून न्यायालयात न्याय मागवा लागला आहे.
नगर पंचायत राळेगाव यानी तोंडी नोटीस दिली नंतर २९/०४/२०२६ रोजी लेखी नोटीस देवून फक्त ७ दिवसांचा अवधी स्थानिक व्यावसायिक यांना देण्यात आला होता. क्रीडा संकुलला जायला रस्ता हवा आहे. त्यासाठी नवीन रस्त्याची निर्मित करत असल्याने नगर पंचायत कडून अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
वास्तविक पाहता क्रीडा संकुलन ला जायला मोठा विस्तीर्ण रस्ता असताना वर्दळीच्या ठिकाणाहून रस्ता देण्याचा कोणताही तर्क नगर पंचायत कडून दिला गेला नाही. हा रस्ता निर्माण करण्यासाठी डीपीआर मध्ये सुद्धा कोणताही उल्लेख नाही. तसेच हा रस्ता निर्माण व्हावा यासाठी सरकारी निधी उपलब्ध नसताना नगर पंचायत कुणाच्या हितासाठी रस्ता करत आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी व्यवसाय करणारे लहान दुकानदार, विक्रेते हे नेहमी मोठ्या शक्तीच्या नजरेत राहतात त्यामुळेच अश्या व्यावसायिकांच्या संरक्षण कायद्याने होणे आवश्यक आहे.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून वि. दिवाणी न्यायालय (क.स्तर) राळेगाव यांनी व्यवसायिक यांनी दाखल केलेल्या दाव्यातील तात्पुरता मनाई हुकुमाच्या अर्जावर आदेश अतिक्रमण धारक दुकानदाराच्या बाजूने झाला आहे. यात स्थानिक दुकानदार यांच्या वतीने अँड. वैभव पंडित यांनी बाजू मांडली तर नगर पंचायत राळेगाव यांच्या वतीने अँड. संदेश झामड यांनी बाजू मांडली.
