
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड उमरखेड (ग्रामीण )
जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामधील 10गावामध्ये “शासन आपल्या दारी “या 10गावामध्ये अभियाना अंतर्गत शिबीरे आयोजित करावयाची आहेत. सदर शिबिरामध्ये खालील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे तसेच निवडलेल्या गावातील नागरिकांना शिबिराविषयी किमान 3 दिवसा पूर्वी संपूर्ण माहिती देण्यात यावी तसेच याबाबत शिबिरामध्ये पुरविण्यात येण्याऱ्या योजना बदल संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात यावी.निवडलेले हे 10गावे.1)पोफाळी, मुळावा, कुपटी 2)विडूळ ब्रमणगांव, चातारी,3)दराटी, बिटरगांव, निंगनूर, सुकळी. ज. या
1)व्ही. व्ही. पवार. नायब तहसीलदार. (नोडल अधिकारी )
शिबिरामध्ये सबंधित गावाचे, तलाठी, ग्रामसेवक, BLO शिक्षक, आपले सरकार सेवा केंद्र, चालक आधार केंद्र, चालक सी एस सी.व्हीएलई (आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड )यानी शिबिराच्या ठिकाणी. न चुकता उपस्थित राहावे असे जिल्हा अधिकारी यवतमाळ यांनी आदेश दिले आहेत.
