छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण कार्यक्रम भाजपाने केला हायजॅक

स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाच डावलले : विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांचा पत्रकार परिषदेतून सनसनाटी आरोप

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दि.१९ फेब्रुवारीला पोंभूर्ण्यात होत असतांनाच नगरपंचायत चे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समिती कडून होत असलेला हा अनावरण कार्यक्रम पूर्णपने चुकीचा असून भाजपाने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजाच्या आड राहून कार्यक्रम हायजॅक करीत स्थानिक प्रशासनाची फसवणूक केली असल्याचाआरोप केलाआहे.शासनाच्या निधीचा गैरवापर करून दिशाभूल करणाऱ्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे दि.१८ फेब्रुवारी ला पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांप्रती आम्हाला गौरव आहे.कार्यक्रमालाही आमचा विरोध नाही मात्र पुतळा स्मारक समितीने जे भाजपा प्रणित कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा आम्ही विरोध करीत आहोत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.पैसा प्रशासनाचा असताना आयोजन मात्र भाजपा प्रणित स्मारक समिती करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार, नगरसेवक बालाजी मेश्राम यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सौंदर्यीकरणासाठी अंदाजे ३५ लक्ष रुपये खर्च करण्यात आला असल्याचे सांगत दि.२२/०८/२०१९ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरता साहित्य पुरवठ्याचा दर निश्चित करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता,व संपूर्ण कामासाठी रस्ता अनुदान अंतर्गत २४,९३,४३३ रुपये निधी शंभु फायबर आर्ट,शेगाव यांना कामाचे कार्यादेश दि.२७/०१/२०२० ला देण्यात आले होते.त्या अनुषंगाने काम पूर्ण झाले असल्याचे सांगीतले.
दि.७/२/२०२३ ला नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायतच्या विशेष सभेत शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष रुषी कोटरंगे यांना लोकवर्गणीतून पुतळा बसविण्यासाठी नाहरकत प्रदान करण्यात आली.व सदर जागा ३ वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आले व करारनामा लिहून घेण्यात आला.यात साक्षीदार म्हणून अजित मंगळगीरीवार,इक्बाल कुरेशी,सुलभा पिपरे,श्वेता वनकर यांची स्वाक्षरी आहे.याच करारनाम्याचा आधार घेत जिल्हाधिकारी यांनी दि.७/२/२०२३ ला आदेश देतांना असे स्पष्ट केले आहे, की स्मारक समितीकडे
सदर आदेशानंतर पुतळा उभारण्याबाबत संपूर्ण खर्च स्मारक समितीने करावा तसेच भविष्यात पुतळ्याची देखभाल व दुरुस्ती या करीता शासनाकडे निधीची मागणी करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती लागू केले असतांना नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांनी दि.१३/१२/२०२३ ला वार्ड नंबर १४ मधील शिवाजी महाराज पुतळा परिसर व चौकातील सौंदर्यीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ८,२३,१८५ रुपये निधी खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व दुरूस्ती नगरपंचायत पोंभूर्णा मार्फत करण्यात येणार असल्याचे प्रमाणपत्र देऊन स्पष्ट केले होते.

स्मारक समिती लीज मिळाल्यानंतर पुतळ्यासाठी स्मारक समिती खर्च करणार असल्याचे करारनाम्यात स्पष्ट केले असतांना यात मात्र समितीकडून फार मोठा गौडबंगाल झाला आहे.वास्तवीक दि.३/३/२०२० ला पुतळ्यासंबंधात कला उपसंचालक(प्र.शा)कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी पोंभूर्णा येथे उभारण्यात येणारे पुतळ्याचे ‘क्ले माॅडेल’ तज्ञ प्रतिनिधी कडून केले असल्याचे व ते क्ले माॅडेल कलात्मक दृष्ट्या योग्य झाले असल्याची मान्यता देण्यात आली होती. सर्व सोपस्कार पार पडत असताना शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेमके कुणी खरेदी केला हा गौडबंगाल अजूनही गुलदस्त्यातच असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेता आशिष कावटवार यांनी केला आहे.

या संदर्भाने मुख्याधिकारी विकास जिडगीलवार यांचेशी संपर्क केला असता मी नुकताच कार्यभार घेतला असून चौकशी करूनच बोलता येईल अशी वेळ मारून नेली. नगराध्यक्षा सुलभा पिंपरे यांनी मीटिंग मध्ये असल्याचे सांगत नंतर मीच फोन करणार असल्याचे सांगीतले, पन उशीरापर्यंत त्यांचा फोन आला नाही. तर तत्कालीन मुख्याधिकारी आशिष घोडे यांचा फोन ‘ स्विच ऑफ ‘ येत होता.