
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत केंद्रीय शाळा जळका येथील व्यवस्थापन समिती ची निवड नुकतिच स्थापन करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा जळका येथे शाळेतील सर्व पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी सर्वानुमते सौ. सोनाली गणेश आडे यांची अध्यक्षा म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली. तर श्री. अंकुश किसनाजी मोरे यांची उपाध्यक्ष म्हणून सदर सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच श्री.जगदिश दादाजी ठाकरे यांची सचिव पदी तर सर्वश्री.अनिल वाघाडे ,संजय येलेकर ,सौ.सविता विलास सकरापुरे,शबाना अफजल पठाण,प्रियका दिपक सोनारखन प्रतिभा विनोद पाल तसेच शिक्षण प्रेमी म्हणून प्रविण पा़ंडे व शिक्षक सदश्य श्रीमती वृंदा आडे सर्वानुमते या सर्व सदस्यांची निवड करण्यात आली
शा.व्य.समितीची निवड करतेवेळी संबधित सर्व पालक,शिक्षक वर्ग उपस्थित होते.
