न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जयंती,निमित्त ” वाचन प्रेरणा दिन”

सहसंपादक : रामभाऊ भोयर

न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे .दिनांक 15 ऑक्टोबर रोजी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरी करण्यात आली. या , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक सुरेश कोवे होते प्रमुख पाहूणे म्हणून, अरुण कामगापूरे जेष्ठ शिक्षिका कु. कुमरे मैडम ब कार्यक्रमाचे आयोजक प्रा. चिकाटे हजर होते. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी डॉ कलामांच्या जीवनचरित्रावर भाषणे दिली

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक सुरेश कोवे व प्रा. रवी चिकाटे यांनी ए, पी. जे अब्दूल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनचरीत्रावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व वाचन प्रेरणा दिनाबाबत व वाचनाच्या महत्वाबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरील केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्याथ्यांना कलामाच्या जीवनचरित्रावर प्रश्न विचारून योग्य उत्तर सांगणान्या विद्याथ्र्याना पुस्तके भेट देण्यात आली व त्यानंतर सामुहीक वाचन कार्यक्रम घेण्यात आला तसेच विदयार्थ्यांना वाचनासाठी ग्रंथालय व वाचन कट्टा उपलब्ध करून देण्यात आला.

सदर उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी .प्रयत्न केले….