
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )
पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. राज्यातला शेतकरी नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेला असतो. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उमरखेड तालुक्यात ढाणकी सावळेश्वर चिंचोली करंजी अकोली बिटरगाव मन्याळी जेवली सहस्रकुंड या परिसरात मोठा पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर पिकाचं नुकसान झालं. त्यातही सोंगणीला आलेल्या सोयाबीनला जास्त फटका बसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
बऱ्याच ठिकाणी सोयाबीन या पिकाला चौरे फुटताना दिसत आहेत तर काही ठिकणी सोयाबीन कापणीस आलेलं आहे आहे. त्यामुळे शेतात पीक असूनही शेतकऱ्यांना काहीही करता आले नाही. परिणामी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच झालेल्या नुकसानीचा लवकर पंचनामा करुन पीकविम्याचा लाभही मिळावा, अशी देखील मागणी शेतकरी करत आहेत.
