6 जून रोजी राळेगाव येथे शिवराज्याभिषेक दिन निमित्य विविध कार्यक्रम

    राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने राळेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भव्य राज्याभिषेक दिन सोहळा किंग ऑफ नागपूर मुधोजी राजे भोसले यांच्या शुभहस्ते सायंकाळी 5:30 वाजता संपन्न होईल याप्रसंगी सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सहा वाजता शिवतीर्थावरून राज्याभिषेक दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस दिल्या जाईल तसेच शिवराज्याभिषेक प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे विविध विद्यार्थी यात सहभागी होतील याकरता 20 मार्काची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली आहे ती प्रश्नपत्रिका छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीमध्ये शिवतीर्थावर उपलब्ध होईल तसेच सायंकाळी सात वाजताशहरातून दहावी आणि बारावी परीक्षेत शाळा महाविद्यालयातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी सात वाजता पासून भव्य नगर भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे