
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अकरावी, बारावी च्या प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी सर्वर डाऊन मुळे होतोय हेळसांड सविस्तर वृत्त असे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, अधिवास, नॅशनॅलिटी, उत्पन्नाचे दाखले या सर्व बाबीची शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी पूर्तता करावी लागत असते. परंतु हे प्रमाणपत्र घेण्यासाठी सीएससी केंद्रावर अर्ज केल्यानंतर ते एक ते दोन दिवसात विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे परंतु राळेगाव येथील तहसील सीएससी केंद्रावर अर्ज केल्यानंतर सर्वर डाऊन मुळे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडकून बसले असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर तहसीलच्या सीएससी ऑनलाइन केंद्रावर गोरगरीब विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आपले कामधंदे सोडून रोज चक्रा माराव्या लागत आहे. परंतु राळेगाव महसूल प्रशासन याचे गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. सदर याबाबत सबंधित सेतू चालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून असे उत्तर देण्यात येत आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व पालकांची हेळसांड होऊ नये म्हणून आम्ही सकाळी सहा वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत सेतू केंद्रावर काम करत आहोत परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही ही ऑनलाईन सुविधा आहे यामध्ये आम्ही तरी काय करणार ? आमचे काम तर आम्ही प्रामाणिकपणे करत आहे परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे आम्ही पण काही करू शकत नाही असे सेतू मधील ऑपरेटर कडून सांगितले जात आहे. हे जरी खरे असले. परंतु मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणे व त्यामधून आपल्या पाल्यांना शिकवणे अशा गोरगरीब पालकांना रोज तहसीलच्या चक्रा माराव्या लागत आहे. याला जबाबदार कोण ? ग्रामीण भागातील गोरगरीब मजुरांनी आपल्या मुलाच्या शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी रोज तहसील भोवती चकरा मारायच्या की आपला उदरनिर्वाह कराचा हाच मोठा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. याबाबत सबंधित अधिकारी यांनी सीएससी ऑनलाइन केंद्रावर जातीने लक्ष घालून ग्रामीण भागातील होत असलेल्या विद्यार्थ्यांची पालकांची हेळसांड थांबविण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.
