
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी आजपासून असहकार आंदोलन करून लेखणी आढावा सभा तसेच ऑनलाइन चे कामे बंद करून आंदोलन पुकारले असून मागण्या मान्य न झाल्यास दिं १ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मग्रारोहयो च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी मागील १० ते १२ वर्षापासून प्रामाणिकपणे अखंडित कामे करीत आहेत तसेच वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेले कामे पूर्णपणे जबाबदारीने व्यवस्थितपणे पार पाडत असून मग्रारोहयो ची कामे वेळेवर पूर्ण करीत आहेत त्याचप्रमाणे covid-19 अशा महामारीच्या काळात सुद्धा त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना शासकीय सुविधा नसताना मग्रारोहयो अंतर्गत योजनेची अनेक गावातील प्रत्येक मजुरांना कामे उपलब्ध करून देऊन रोजगार दिला असे असताना सुद्धा मागील तीन-चार वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी यांना कोणतेही मानधानात वाढ झालेली नाही तसेच सीएससी मार्फत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व वैधानिक फायदा दिला जात नाही त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असताना सुद्धा योजनेमध्ये काम करणारे काही निवडक कर्मचारी हे राज्य निधी असोसिएशन मधूनच नियुक्ती सह मानधन घेत आहेत त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा मानधन व नियुक्ती राज्य निधी असोसिएशन मधून देण्यात यावी तसेच मागील वित्तीय वर्षांमध्ये पी एम आणि एमआय एस याचे मानधन १४ ते १५ हजार रुपयांनी वाढविण्यात आले परंतु आज गायत आम्हा कंत्राटी कर्मचारी यांना मानधनात कोणती वाढ झालेली नाही तसेच मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना आकृती बंद मध्ये समायोजन करण्यात यावे तसेच पश्चिम बंगालच्या धरतीवर मानधन देण्यात यावे या योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना राज्य निधी असोसिएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या तसेच मध्य प्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी आदी मागण्या मंजूर करण्यात कराव्या अन्यथा १ फेब्रुवारीपासून संपूर्ण काम आंदोलन पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला एक एका निवेदनातून दिला आहे.
