
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्रतिष्ठित नागरिक तथा जेष्ठ शेतकरी देवराव नारायणराव तेलंगे वय 68 वर्षे यांनी स्वतःच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यात 28/8/2024 रोजी पहाटेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली.मृतक शेतकरी देवराव तेलंगे यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना दोन मुली आहेत.त्या दोन्ही मुलींचे लग्न झाले असून ही आत्महत्या सततची होणारी नापिकीमुळे व मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जामुळे विवंचनेत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती त्यांच्या परिवारातील सदस्यांनी दिली असून या आत्महत्येमुळे शेतकरी, गावकरी बांधवात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
