
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी योग्य दिशेच्या शिक्षणाची निवड करण्याच्या दृष्टीने शाळेच्या प्राचार्या डॉ. शीतल बल्लेवार व संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार यांच्या पुढाकाराने ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना दहावी व बारावी नंतर आपले करियर कसे निवडावे या अनुषंगाने मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश हायस्कुलचे माजी प्राचार्य श्री.अशोक पिंपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेला वित्त व लेखा अधिकारी, महाराष्ट्र शासन तथा ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे चे संस्थापक डॉ. विशाल भेदूरकर सर व रेडीअंट बँकिंग अकॅडमी, यवतमाळचे संचालक श्री. अमोल चेपे सर यांनी दहावी व बारावी नंतर कुठले क्षेत्र अनुकूल असते, यशस्वी करियर निवडतांना तंत्रज्ञानाची योग्य सांगड कशी घालावी, ट्रेंड असलेल्या क्षेत्रातील सद्य स्थितीतील व पुढील पाच वर्षात असणारी स्पर्धा याविषयी समुपदेशन केले. नेताजी विद्यालय, संस्कृती संवर्धन विद्यालय, इंदिरा गांधी विद्यालय व मार्कण्डेय पब्लिक स्कुल या शाळेतील विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले. विशेष म्हणजे या कार्यशाळेला पालकांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली. नेताजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप ओंकार सर, शिक्षिका केवटे मॅडम, संस्कृती संवर्धन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी दहीवलकर मॅडम, शिक्षक नक्षने सर, मार्कण्डेय पब्लिक स्कुल चे सर्व शिक्षक व शिक्षिकांचे सहकार्य लाभले.
