
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी कर्जमाफी करीता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पापळ ते चिलगव्हाण 7/12 कोरा यात्रा यात्रा सुरु आहे, या आंदोलनात राळेगाव येथील युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला
राळेगाव नगर पंचायतचे नगरसेवक मंगेश अशोकराव राऊत, प्रहार तालुका अध्यक्ष संजय दुरबुडे, राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके,राहुल बहाळे, नितीन कोमरवार यांनी पदयात्रा मध्ये सक्रिय सहभाग घेतला.
मातीच्या स्वातंत्र्याचा लढा हा उद्देश ठेऊन शासनाला जाग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली.
14 तारखेला अंबोडा येथे सभा होणार असून त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन बच्चुभाऊ कडू यांनी केले.
या यात्रेत राळेगाव येथील नागरीक सहभागी झाले.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेली ही पदयात्रा हा शेतकऱ्यांचा हुंकार आहे. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, कष्टकरी यांच्या आतित्वाचा हा लढा आहे. पक्ष, विचारधारा, राजकीय भूमिका या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी कुणीही रस्त्यावर उतरत असेल तर त्या प्रामाणिक प्रयत्नाला प्रत्येकाने साद देणे, प्रतिसाद देणे ही आज काळाची गरज ठरते. राळेगाव येथील अनेक सहकारी यात सहभागी झाले. शेतकऱ्यांसाठी एकत्र होने आवश्यक आहे.
–मंगेश राऊत नगरसेवक न. प. राळेगाव
