
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रजनीकांत नामदेवराव परचाके यांची ट्रायबल फोरम राळेगाव तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ते आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असतात.
त्यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे.
‘ट्रायबल फोरम’ हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे. राज्यात आदिमांच्या चळवळीत अग्रगण्य,वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे.
वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे राळेगाव तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.ते आपल्या निवडीचे श्रेय जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे, महासचिव दीपक करचाल, तालुकाध्यक्ष शंकर पंधरे,तालुका महासचिव संजीव मडावी,उपाध्यक्ष सुनील मेश्राम यांना देतात.
