
प्रतिनिधी, प्रवीण जोशी, ढाणकी
दिनांक 28 नोव्हेंबर रोजी अभिनव विद्या विहार हायस्कूल या ठिकाणी क्रांतीसुर्य व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यानुमोदन दिनाचे औचित्य साधून दराटी येथील विद्यालयात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी शाळेचे कर्तव्य दक्ष असलेले मुख्याध्यापक के पी राठोड व प्रसिद्ध कबड्डीपटू ज्ञानेश्वर चव्हाण व श्याम पाटील, दुग्ध उद्योजक हडसनीकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली विशेष करून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कबड्डी पटू ज्ञानेश्वर चव्हाण यांची उपस्थिती होती. आजकाल आपण बघतोच आहे ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा हा शहराकडे आहे. याच कारणाने खेडेगाव ओस पडत आहेत. ज्ञानेश्वर चव्हाण सुद्धा पुणे येथे नोकरीवर कार्यरत आहे. पण आपल्या गावाप्रती आजही त्यांनी तेवढेच नाते जपले आहे. विशेष यावेळी त्यांनी जीवनात आलेल्या कबड्डीचा प्रवास उलगडला व संतांनी सांगितलेल्या मनी प्रमाणे आपणास जे जे ठावे ते इतरांशी सांगावे. या उक्ती प्रमाणे कबड्डीचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा मुलांना सांगितला ते म्हणाले ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे दारी खुली करण्याचे पवित्र कार्य पार पाडले. तसेच समाजामध्ये असलेल्या अनिष्ट चाली रूढीचा प्रतिकार करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याची कठीण काम त्याकाळी केले त्या महान कार्याची परतफेड आपल्याला कदापी करता येणार नसल्याची भावना ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी भरणे यांनी केले कार्यक्रमाची सांगता बी पी मुरगुलवार यांनी केली. व या कार्यक्रमास व्ही पी राठोड, जी एन ढगे, एस बी पाटील, पी एस घुले, पि के कावळे व शाळेचे सर्व कर्मचारी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
