
दारूचे व्यसन इतके भयावह असते की. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होताना आपण बघितले आहे. हे दारूच्या व्यसनात अडकलेले लोक बऱ्याचदा त्यांची इच्छा असतानासुद्धा त्यातून बाहेर निघू शकत नाही. त्यांना समाजात केवळ तिरस्कारच मिळत असतो. अशा लोकांसाठी अल्कोहोलीक्स ॲनानिमस ही स्वंस्था सेवा देत आहेत. या संस्थेच्या सभांना उपस्थित राहून शेकडो लोकांची दारू बंद झाली आहे. ते आणि त्यांचा परिवार आनंदात जीवन जगत आहे. ज्यांना दारूपासून दूर राहण्याची इच्छा आहे. ते या संस्थेचे सभासद होऊ शकतात. त्यासाठी कुठलीही वर्गणी आकारली जात नाही. ए.ए. सदस्यांचा एकाच उद्देश असतो, स्वतः दारूपासून दूर राहणे व इतरांना मदत करणे.
‘मद्यपाश एक आजार’ जनजागरण सभा
कृती समूह वडकी चा सहावा वर्धापन दिवसानिमित्त ”मद्यपाश एक आजार’ या विषयावर जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार सुखदेवजी भोरकडे , प्रमुख उपस्थिती डॉक्टर उज्वला बरबटकर व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील इंगोले होते.
अल्कोहोलीक अनॉनिमस ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून 180 पेक्षा जास्त देशात काम करते. अति प्रमाणात दारू पिणारे लोक एका आजारामुळे पित असतात. त्या आजारावर या सामूहिक उपचारपद्धतीमार्फत उपचार होतात. त्यांच्यात मानसिक बदल होऊन दारूपासून दूर राहतात. अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते ‘ या कार्यक्रमात या संस्थेची दखल घेण्यात आली, कृती समुह गेल्या सहा वर्षा पासुन वडकी, ता.राळेगाव येथे काम करीत आहे.नियमित सभा दर बुधवार,शनिवारला सायंकाळी ७ ते ८ या वेळात होतात. या व्यतिरिक्त ए. ए. च्या सभा जिल्ह्यात वणी,मारेगाव, वडकी, कुंभा राळेगाव, यवतमाळ, इत्यादी ठीकाणी सुद्धा होतात.