
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी करंजी येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या प्रसाद ठाकरे यांचे संघटन कौशल्य, नेतृत्वगुण आणि युवा उर्जा लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये सकारात्मक विचारधारा रुजवण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
“राळेगाव तालुक्यातील युवकांना प्रबळ, सशक्त आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. भाजपच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून संघटन बळकट करण्यासाठी काम करणार आहे. या संधीचे श्रेय आमदार व राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुलसिंह चौहान यांना देतो,” असे प्रतिपादन प्रसाद ठाकरे यांनी केले.
यावेळी त्यांनी तालुक्यातील सर्व युवकांना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचे आवाहन केले. तसेच, लवकरच युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, संवाद सत्रे व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
