राळेगांव तालुक्यातील युवतींचा मोठ्या संख्येने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 22 जुलै 2024 रोजी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रफुलभाऊ मानकर आणि माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतराव पुरके सर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील युवतींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश घेतला आहे. देशातील तसेच राज्यातील युवकांसाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रतिकूल परिस्थिती असल्याने आज देशातील २५ हजार उच्च विभूषित युवकांनी बेरोजगारीच्या कारणाने आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणून देशात युवकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलेला आहे. जगामध्ये सर्वाधिक युवकांची संख्या भारतात आहे, मात्र याच देशातील युवक निराशेचे शिकार झालेले आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी देशातील युवकांना भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून युवकांना आशेचा किरण दाखविला म्हणून आज युवा वर्ग राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेशी मोठ्या प्रमाणात जुळत आहे.
यावेळी कार्यक्रमामध्ये नगरसेवक नंदुकुमार गांधी,नगर सेविका तसेच राष्ट्रीय काँग्रेस महिला राळेगाव शहर अध्यक्ष ज्योत्स्नाताई राऊत , शहर काँग्रेस अध्यक्ष प्रदीप ठुणे , तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष धवल घुंगरूड , काँग्रेस अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सज्जाद सय्यद , युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सनी छोरिया, काँग्रेस नेते भानुदास राऊत, गजानन पाल, अप्सर अली सय्यद , राजेंद्र दुधपोळे, बंडू लोहकरे आदी अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धवल घुंगरूड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अप्सर अली सय्यद यांनी केले.