
सहसंपादक: रामभाऊ भोयर
सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय , डॉ वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि सुमती शिक्षण संस्था, यवतमाळ या संस्थांच्या वतीने दरवर्षी वैद्यकीय, सामजिक आणि शिक्षण या क्षेत्रात सेवानिष्ठेने कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान कारण्यात येतो,त्यापैकी सुमती शिक्षण संस्था द्वारा सामाजिक क्षेत्रातील कार्या करीता प्रा. डॉ. सुमतीताई कोलते यांचे सौजन्याने दिल्या जाणारा सुमन तुलसियानी मानव सेवा पुरस्कार माधुरी खडसे- डाखोरे सचिव प्रेरणा ग्राम विकास संस्था यांना दि. 28मार्च 24 ला महाविद्यालयाचे सभगृहातील कार्यक्रमांत डॉ विजय कावलकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला असून अनुपम वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉ ओ एस लचके तर सावित्रीबाई प्रेरणा पुरस्कार मनिषा शिरभाते यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुमती कोलते तर प्रमुख पाहुणे डॉ विजय कावलकर, डॉ रमाकांत कोलते, साधना बंडेवार, प्राचार्य डॉ अरुण शेंडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अरूण शेंडे यांनी तर संचलन प्रा. सीमाताई शेटे यांनी केले, कार्यक्रमा करीता संस्थांचे मान्यवर संचालक, प्राध्यापक वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
