
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या निधा येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि निधा ग्रामवासीयांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा तसेच गाडगे महाराज यांचा 69 वा पुण्यस्मरण महोत्सव दि. 30 ते 1 फेब्रुवारी पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दैनंदिन कार्यक्रम 30 जानेवारी रोजी तीर्थस्थापना ह.भ.प. गजानन सुरकर महाराज यांचे हस्ते सकाळी 6 वाजता रामधुन 7 वाजता आणि 6 वाजता सामुदायिक प्रार्थना 7 ते 8 हरिपाठ रामकृष्णहरी भजन मंडळ निधा 30 तारखेला रात्री ठीक 8 वाजता राष्ट्रीय कीर्तनकार व सप्तखंजरीवादक कु. क्रांतीताई काळे यांचे जाहीर कीर्तन घेण्यात आले. व दि. 31 तारखेला ह.भ.प. पीयुष महाराज यावले यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तरी या कीर्तनाच्या माध्यमातून गावकऱ्यांना प्रोस्थाहित करुन ग्राम स्वच्छता व बाल विवाह, बालरोजगार, बेटी बचाव, बेटी पढाव यांच्यावर, मार्गदर्शन केले. दि. 1 तारखेला हरि भक्त परायण देशमुख महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. गावामध्ये दिंडी काढण्यात आले , व महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून संत तुकडोजी महाराज यांचे फोटो ठेऊन संपुर्ण गावाभोवतील फेरी काढण्यात आली. आई आणि वडिलांची माया मुलासाठी काय असते हे स्पष्टीकरण करुन कु.नमिता क्षीरसागर हिने सर्वांचे मन जिंकले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बापू शेरअली, किशोर कडखार, सुरकर महाराज, गणेश फटिंग, गोपाल भटकर, (पत्रकार) नरेश राऊत,खंगार महाराज, दाते महाराज, विलायतकर, अंबादास लालसरे, क्षीरसागर , शंकर पिंपरे, सीमाताई अष्टकर, आवारी ताई आभार प्रदर्शन डॉ. द्यानेश्वर मुडे यांनी केले. समस्त निधा ग्रामवासी यांच्या सहकार्यातून पुण्यतिथी सोहळा पार पडला .
