
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात काही प्रमाणात डेंगुचे पेशंट आढळून आल्याने या सर्वनाश करण्यासाठी ग्रामपंचायत वाढोना बाजार येथील सरपंचा सौ. जयश्रीताई मांडवकर.उपसरपंच योगेशभाऊ देवतळे सदस्य राजुभाऊ आडे तसेच आरोग्य अधिकारी डाॅ .कुडमथे सचिव कडू व विनोदभाऊ मांडवकर,वावरे,गुडधे यांनी गावाच्या आरोग्याची काळजी घेऊन डेंगु आजाराचा जास्त प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून जंतुनाशक फवारणी करन्यात आली संध्या तालुक्यात ताप सर्दी खोकला या आजाराने नागरिक भयभीत झाले आहे गावातील काही नागरिकांनी सरपंच सौ मांडवकर यांना फवारणी करन्यात यावी अशी माहिती दिली असता सरपंच यांनी क्षनाचा विलंब न करता संपूर्ण गावात फवारणी केली.
