
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ :- स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन सभा ल्याकत बि शेख यांचे अध्यक्षतेखाली तर कॉ.दिवाकर नागपुरे, जिल्हाध्यक्ष, कॉ.शंकराव कदम, कॉ.नामदेव ढोरे, कॉ.कैलास कांबळे कॉ. सुरेखा कोमेजवार यांचे मार्गदर्शनात नुकतीच संपन्न झाली दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी एकदिवशीय लाक्षणिक संपात शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन सहभागी होणार असून प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी-मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी ११ वाजता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चा श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक दवाखाना जवळ यवतमाळ येथुन निघणार आहे
राज्यातील स्वंयपाकी मदतनिस यांच्या मानधनात दरमहा १०००/- (एक हजार) मानधनवाढ व इतरही मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. आपल्या मांगण्याच्या पुर्ततेसाठी केंद्रसरकार व राज्य सरकार यांचे लक्ष वेधण्यासाठी काम बंद ठेऊन संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हयातील प्रधान मंत्री पोषण शक्ती योजना पात्र शाळांतील शालेय पोषण आहार शीजविण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी असे आदेश सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना मा.शिक्षणाधिकारी जि.प.यवतमाळ यांनी दिले आहेत त्यामुळे शीक्षक वर्गानी स्वयंपाकी मदतनीस यांना मोर्चात सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन शीक्षक वर्गाना संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. मांगण्या-१) दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी काढलेल्या आक्रोश मोर्चा नागपुर हिवाळी अधिवेशना दरम्यान दिलेल्या आश्वसनाप्रमाणे दरमहा रू.१०००/- मानधनवाढ बाबत शासन निर्णय १ एप्रिल २०२४ पासुन लागु करुन शासन निर्णय काढावा.२) स्वंयपाकी / मदतनिस यांना दरमहा किमान वेतन रू.२६०००/- द्या. व त्यांना सामाजिक सुरक्षा लागु करा.३) स्वंयपाकी /मदतनिस यांना १० महिन्याऐवजी १२ महिन्याचे मानधन द्या.४) स्वयंपाकी / मदतनिस यांना दरवर्षी दोन महिन्याचे मानधन दिवाळी/ भाऊबीज भेट म्हणुन बोनस द्या.५) स्वंयपाकी / मदतनिस यांना गणवेश व ओळखपत्र द्या.६) स्थानिक व्यवस्थापन समितीने परस्पर कामावरुन कमी केलेल्या स्वंयपाकी मदतनिस यांना परत कामावर घ्या.७) केंद्र सरकारने सन २०११ पासुन मानधनवाढीत वाढ केलेली नसुन याबाबत केंद्र सरकारला मानधनवाढी बाबतचा प्रस्ताव पाठवा.८) स्वंयपाकी / मदतनिस यांना दरमहा मानधन वेळेत ०१ तारखेला द्या.९) इंधन व भाजीपाला बिले वेळेत मिळावे.१०) सर्व कामगारांना समान काम समान वेतन द्या. यांसह इतरही मागण्या घेऊन मोर्चा होणार आहे तरी यवतमाळ जिल्ह्यातील स्वयंपाकी मदतनीस यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉ.विलास ससाने, जिल्हा सचिव,
मोहन आडे, गोपाल घोडाम , सुरेखा पांडे, रूखमीणा बंम, सुष्मा बैस, करूणा डांगे, सविता गोरे,सुमीता वाठोरे, छाया बोडगे,रब्बाना शेख, दिपाली खानझोडे, मंगला जांभळे, शारदा ढोकलवाड, उषा नागोसे, मीना पाटील,चंदा चौधरी,प्रणीता घोडाम, अश्विनी आंबेडकर, नंदा राठोड, मंदा भोयर, रंजना लोनबले, जया कांबळे, तैमुन ,वणीता कांबळे, पुष्पा निकोडे, शारदा उन्नमेय, सुनिता वड्डे, सुनिता राऊत, सिमा चौधरी,गोकुळा काळे, शोभा नांद, वैशाली परसोडे, संगीता मोरे,संजीदा खान, माया किनाके, परशुराम मेश्राम, मंगला मेश्राम, ललीता तीजारे, बाजीराव गायकवाड, रामधन जाधव, लता सवाईमुल, गायत्री गुल्हाने, मंजुषा तायकोटे, मेहरबानो,फातेमाबी, अनिता डेहनकर, संध्या जांभुरे, प्रिती चव्हाण, अनुसया नागोशे, तुळसा मेशकर, सुरेखा कुंमरे, निर्मला गेडेकार, सुकेशनी घायवान,विद्या टेकाम, प्रतीभा मेश्राम, रंजना मडावी, रंजना टेकाम , सुवर्णा कंगाले, नंदाताई आत्राम, कुमूदबाई मडावी, सुखदेव धुर्वे, अमीत सावरकर, अजाबराव शेंडे, शोभा चाफले, कुसुम चाफले, सिमा देठे, माया कोटेजावरे, रेखा दाबेकर, पार्वताबाई राऊत, सुमीत्रा मसराम, सुशमा सोनवणे,सुंद्रर साक्रापुरे, अनुसया नागोशे, सविता किन्नाके, उषा नेहारे,गीता फुसनाके, मंगला परचाके, पल्लवी वसाळे, सिंदुबाई तीवसे, मीराबाई पिंपरे, मंजु क्षीरसागर,सिमा मेश्राम, संजना भोंगळे, राजु भोंगळे, वर्षा धंदरे, सिंधू मांढरे, मंजुषा वनकर, प्रतीभा कांबळे, मंदा किन्नाके,गीता गेडाम, शालु वाघाडे, सुनिता कडु, वंदना मेश्राम, बंडु वनकर, सुवर्णा कुकडे, निर्मला टेकाम, प्रतीभा मेश्राम, हर्षदीप मेश्राम, सुरेश गायकवाड, मंगला अर्के, कल्पना सोयाम, जयश्री पांचगे,रूपेश मसराम, प्रविण सोनटक्के,अंनता बोकडे, साईनाथ बल्की, प्रशांत लोहकरे, सुरेखा चौधरी,प्रेमीला खंडारे,रीना पुरी, वाणीता जाधव,योगीता ठाकरे, संगीता कवाळे,पंचशीला कांबळे, सुचिता पाईकराव, सुवर्णा विठेवार, प्रजापती दवने, वंदना पारधी, अनिता जोगदंड, वर्षा राठोड, नर्मदा मरापे,योगीता मंदावार, अर्चना मेश्राम, विजय आडे,पुष्पा तामगाडगे, अरूणा गजभिये, वंदना अगलधरे, आश्वीनी भोयर, अरूणा पीलावन यांनी केले
