
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची पिकांची हालत कुठे कमी पाऊस तर कुठे अतिशय जास्त झाल्याने शेतकरी बांधवाचे होत्याचे नव्हते झाले असल्याचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने यवतमाळ वाशीम लोकसभा खासदार भावनाताई गवळी यांच्या वतीने शासनाकडून पिक विमा मिळवून देण्यासाठी निवेदन पाठवून विनंती करण्यात आली.
संदर्भ :-दि.९/१०/२०२३ सोमवार रोजी ची जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती च्या मीटिंग मधील विषय क्र ११ (पिक विमा)
महोदय,
वरील विषयी विनंती आहे की.शेतीहंगाम २३/२४मधे यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी व बर्याच ठिकाणी अनियमित पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.शासनाचे १रुपयात पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षीत केले आहे.शेतीचे/पिकांचे झालेले नुकसानाचे काही सर्वे झाले आहे, परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही.
महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा योजनेतून अग्रीम मिळवून द्यावा, याकरिता ९/१०/२०२३चे मीटिंग मध्ये आपण मागणी करावी.विमा कंपनी अग्रीम देत नसेल तर शासनस्तरावर आपण तजवीज करणेस प्रयत्न करावे अशी मागणी
सुधीर रामदासबाप्पु जवादे
यांनी केली आहे.
