
दोन दिवसापूर्वी भटाळी या गावामध्ये एक दुखद घटना झालेले होती. संजयभाऊ गांडलेवार यांचं निधन झालं. संजयभाऊ गांडलेवर हे त्यांच्या घरासमोर पडल्यामुळे त्यांच्या मेंदूची नस फाटली त्यात त्यांना सरकारी हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले, पण त्यांना तिथून नागपूर येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये रेफर करण्यात आले पण त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. काही महिन्यापूर्वी त्यांना पत्नीशोक झालेला होता आणि परत आता संजयभाऊ गांडलेवार यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे लहान दोन मुलं आई-वडीलास पोरके झालेले आहेत. ही बातमी काही सामाजिक दायित्व असलेल्या तरुणांना समजली, अशा दुःखद प्रसंगी सामाजिक भावनेतून त्यांना थोडासा हातभार लागावा म्हणून त्यांना छोटीसी आर्थिक मदत म्हणून 10,000 रु. चा धनादेश आज दिनांक 6/1/2023 ला त्यांच्या मुलांना देण्यात आला. यात सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे, गौरीशंकर मेहता, शिवा मिनरवार, मुरली तिवारी, लक्ष्मण नेहारे, विकास वाढई, राजू मोलगुरु, वासुदेव सवडे, शरद देवतळे, विकास पेंद्राम आणि रजनीश रायपुरे यांनी मदत केली.
