राळेगाव पोलीस स्टेशन येथे श्री.संत गाडेबाबा विचार प्रबोधन संस्था यांचा अंधश्रद्धा निर्मूलन व जादुटोणा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

श्री.संत गाडेबाबा विचार प्रबोधन संस्था यांचा अंधश्रद्धा निर्मूलन व जादुटोणा या अत्यंत महत्वाचे विषयावर कार्यशाळाचे आयोजन राळेगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक श्री.श्रीकृष्ण घोटे सरांनी उत्तम रित्या मार्गदर्शन केले तसेच समाजात ग्रामीण भागात होनारे विविध प्रकारच्या अंधश्रद्धा व जादुटोणा ह्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले त्यात प्रमुख पाणी पाहण्यासाठी नारळची पाहणी,कुंकू काळा होणे,महालक्ष्मी बसते त्यावेळेस जी गुडी पाहण्याचा प्रकार आहे तो मुख्यतः अंधश्रद्धा मधलाच एक प्रकार आहे ,गडव्यातुन गंगा कशी प्रवाह करतात अशी भरपुर प्रात्यक्षिके करुण दाखवण्यात आले .तसेच सरांनी मार्गदर्शन केले, उदा.एखादी व्यक्तीच वाढदिवस असतो तेंव्हा आपन काही तरी भेट घेऊन जात असतो जे त्या व्यक्तीला एवढ जरुरी नसते पण ,एखादि व्यक्ती बिमार आहे त्याला पैशाची कमतरता आहे आपन मात्र तिथे त्या व्यक्तीच्या भेटीला रिकामे हाती जातो हे आत्मचिंतनाचा विषय आहे भेट कुठे व कोणत्या स्वरूपात द्याची.समाजात बली प्रथा ,जादुटोणा, अंधश्रद्धा ,फसवणुकीचे प्रमाणांत वाढ झाली आहे आपन सगळे सावध राहने गरजेचे आहे,समाजात अशी कोणतेही प्रकार आपल्या निदर्शनास आल्यावर आपन ते उघडकीस आनले पाहीजे ,अश्या प्रकरणाला वेळीच थांबवले पाहीजे ,तेंव्हाच देशातुन अंधश्रद्धा जादुटोणा चे प्रकार कमी होतील,मा.ठाणेदार जाधव सर थोडक्यात अंधश्रद्धा जादुटोणा वर सांगितले कि कधी कधी आपल्या मधलीच व्यक्ती शेजारच्या व्यक्तीच्या उंबरठ्यावर लिंबु मरची ठेवुन देतो त्याचा फायदा उचलतो ,”तर तो फायदा कसा “,ज्या व्यक्तींचे आपसात पटत नाही हे त्या तिसर्या व्यक्तीला माहीत असते आणि ह्या सगळ्या कृत्याचे नाव अमावस्या,पोर्णिमेच्या नावाने अंधश्रद्धा पसरवुण देते अश्या पध्दतीने फायदा उचलते ,असे होता कामा नये वेळेच्या आतच ह्या विषयावर आळा घातला पाहीजे,ह्या कार्यक्रमाचे वेळी उपस्थित ग्रामीण भागातील पोलीस पाटील,महीला वर्ग ,शांतता समितीचे सदस्य सौ.माधुरीताई डाकोरे,सौ.संतोषीताई वर्मा,कु.गौरी वर्मा,सौ.दिक्षाताई नगराळे,गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ही हजर होते,ह्या कार्यक्रमाने जन सामान्यात चांगलीच चर्चा झाली सगळ्यांना एक वेगळाच अनुभव आला व राळेगाव पोलीस स्टेशनला धन्यवाद दिले की अशे कार्यक्रम ग्रामीण भागात शाळेत ईतर ठिकाणी ही अशे कार्यक्रम राबविण्यात आले पाहीजे.